Quotes by Eshwari in Bitesapp read free

Eshwari

Eshwari

@eshwari


संभ्रम

मन तर हरवलंय
इथेच कि आणखी कुठे
माहित नाही माहित नाही

विचारांचा माजलाय कल्लोळ
पण वागू तरी नक्की कसं
माहित नाही माहित नाही

कितीतरी वाटा समोर
पण जायचे नेमकं कुठं
माहित नाही माहित नाही

सगळे चांगलेच आहेत
पण विश्वास ठेऊ का नको
माहित नाही माहित नाही

मन रिक्त झालं की गच्च झालंय
मुक्त व्हायचे की,दबायचे
माहित नाही माहित नाही

हास्य तर आहे ओठी
मग मन का पाझरतंय
माहित नाही

ईश्वरी

Read More

#kavyotsav2

घाव प्रेमळ गोधडीचे

सट्टा सट्टा डोक्यात तिच्या धोपटणं
पाषाणावर फाट फाट निर्दय आपटणं
आईग !!तरी किती मायेनं तिचं थोपटणं
लय भारी गोधडी तुझं ते हळुवार कुशीत घेणं ...

लांब लचक ती सुई, तुझ्या पोटात भोसकणं
सहन तर करतच असतेस नेहमीच उसवणं
रक्त बंबाळ झालीस तरी काय गोड हसणं
उब तुझी हवी हवीशी आवडतं तुझं कुरवाळनं ...

जाणवे तूझ्यात आईचा स्पर्श आणि आजीचं बोलणं
हसतच लगेच माफ करतेस लेकरांचं ते तुडवणं
थंडी जाता कपाटात श्वास रोकुन निवांत पड़ून राहनं
तुझा शत्रू असे गारवा तरीही परत त्याचीच वाट पाहनं ...

अजब तुझं घाव सोसून सार्वां प्रेमऊब देनं
मतलबी सजीवांना हा धडा , निर्जीवांचं हे वागनं...

ईश्वरी

Read More

#kavyotsav2

काळीज माझं रक्त बंबांळ

काळजाने परीधारीली दुःखकाट्यांची माळ
आई ग !!!! टोचते ईश्वरा फार
काळजाला लागली धार
काळीज माझं रक्त बंबांळ,रक्तबंबाळ..

बालपणापासूनच संकटांशी जोडली नाळ
अरे देवा सहवेना सारखा प्रहार
करते लगातार प्रतिकार
काळीज माझं रक्त बंबांळ,रक्तबंबांळ..

काळजाचे जहाले चिथडे उरी तो जाळ
आतच घुसमट,कैसी ही कोंड मार
घालता येईना कोणाला फुंकर
काळीज माझं रक्त बंबांळ,रक्तबंबांळ..

ईश्वरी

Read More