कवितेचे नाव: काळ आला होता पण वेळ नाही
दमा, खोकला अन वृद्धापणात
हात पाय टेकले होते
मी जाणार म्हणुन सगळे
तुंबुन बसले होते
हातपायाची हालचाल बंद होती
डोळे मात्र टवटव दिसायचे
मला काय ठाव आपणास एका
दिवसावर जगायचे
मृत्यु समोर होता पण मरण
तर लांब नाही
माझा काळ आला होता
पण मृत्युची वेळ नाही
मी मेलो अस समजुन मला
तिरडीवर बसवले
श्वास चालु तरी लेकाने
जिवंतपणीच जाळायचे ठरवले
मी गेलो चित्तेवर जळायला
अग्नीचे चटके लागले कळायला
शेजारी मी घरी आल्यावर
लागले भुत म्हणुन पळायला
जिवंतपणी माणुस मेला म्हणुन
जाळण खरच खेळ नाही
काळ प्रत्येकाचा येतो
पण वेळ नाही
काळ माणस मारून पाहतो
पण वेळ मरू देत नाही
काळ यमाचा म्हणुन अपघात होतो
पण वेळ देवाची मरण घेत नाही अंघोळीची तयारी नातलगांना
फोन चालु झाले
पोर माझी रडली तर माझ्याच
डोळ्यात पाणी आले
डोळ्यातल पाणी बघुन
पोर म्हणले बाबा जगले
शेजारी म्हणाले अरे! ते तर
अंघोळीचे पाणी आले
चार खांदेकरी अन पाणी
पाजायला पोर आली
मी जिवंत असतानाच मला
जाळायला निघाली
एक थापड खांदेकऱ्याला
लगावुन दिला
मी जिवंत आहे म्हणुन तो
सर्वांना सांगु लागला
मी तिरडीवर झोपलो डोळे उघडुन
तर कोणाचा कोणाला मेळ नाही
हात पाय थांबले म्हणुन
काळ आला पण मृत्युची वेळ नाही