खट्याळ ते बालपण
प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील एक टप्पा असा असतो कि,तो प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. ओळख पाहू,कोणता आहे तो ? बरोबर ना ? तुम्हाला सुद्धा हे बोलायचं आहे ना ,बालपण ! ज्यात निरागसता, शून्य भाव,असमंजसपणा, हव्यास,इत्यादी. अनेक भावनांचा संगम असतो आणि आपल्या मुलांना पाहिलं की, हमखास आपणास त्यांना बालपणाच्या गोष्टी सांगावयाची इचछा होते आणि सांगून आपल्या हृदयाच्या हळुवार कप्प्याचे दार उघडतो.
बालपण म्हणजे खेळण्या बागडण्याचे दिवस, पसारा करणे, निरनिराळे खेळ खेळणे, वेगवेगळे छंद जोपासणे. नवीन नवीन वस्तूंचा संग्रह करणे, भांडणे,आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हट्टीपणा करणे,लाड करवून घेणे.
बालपणाच्या बाबत सांगायचे म्हणजे,हा आयुष्यातील जितका गोंडस,सुंदर स्वप्नवत असा टप्पा आहे,तितकाच संस्कार घडवून घेणे यासाठी सुद्धा तितकीच महत्वाची ही पायरी आहे. जसे मोठे सांगतील तसेच वागायचे असे ते बालपण सांगत असत आणि आपण तसेच वागत असतो. त्यामुळे संस्कारांच्या बाजूने देखील या वयाला तितकेच महत्व आहे.
बालपणात आपल्याला कशाचे हि भान नसते. वेळ,काळ भूक तहान या गोष्टी आपल्या दृष्टीने दुय्यम दर्जाच्या असतात. प्रथम गोष्ट मनासारखं सगळं करवून घेणे.,इतरांना भाग पाडणे.मनसोक्त खेळणे,बागडणे एवढेच काम या वयातले, इतर कोणतेही ओझी या वयात वाहावी लागत नाही.अभ्यासाचे ओझे शाळा सुरु झाल्यावर सुरु होते,मात्र सुट्टी लागल्यावर दोन महिने नुसता धुमाकूळच ! सुट्टीतील गंमतीजंमतीची मोठी यादी शाळा चालू असतानाच बनवली जायची.गावांच्या फेऱ्या, नवीन मित्रांची ओळख, मस्त मस्त खेळ.. गोट्या खेळणे,कॅरम खेळणे.. पत्ते, क्रिकेट अशा आणि बरेच खेळ आम्ही खेळात असायचो. शिवाय घरी मामा-मामी आणि मामेभाऊ बहिणी यांचं सुट्टी साठी येणं असायचंच. खूप दंगा करायचो खरं तर आम्ही. छे दूर राहिले ते माझे बालपण असे वाटते आता ! या वयात आपण मूळ आणि खऱ्या जगापासून कोसो दूर असतो आपल्या आई बाबांच्या आयुष्यात काय चालू आहे? आजी आजोबांचं काय चालू आहे? या गोष्टीकडे आपले लक्ष नसते, किंबहुना या गोष्टी मनात डोकावत देखील नाही. जगात चाललेला भ्रष्टाचार,महागाई,संसाराची ओढाताण.पूर,दुष्काळ यासारख्या मोठमोठ्या आपत्ती यांना काहीच ओळखत नाही. या वयात,
सुंदर जीवन बनवायचे,
सुंदर जीवन जगायचे,
सुंदर विचार शिकायचे,
सुंदर सुंदर बोलायचे,
सुंदर छान ऐकायचे,
सुंदर गोष्टी पाहायच्या.
सुंदर गोष्टींचा आस्वाद घ्यायचा.आणि पुढे जाऊन या वयात आपण काय करायचो राहील तर नाही ना ? असा विचार करायचा नाही. इतकं बागडून खेळून घ्यायच कारण असे हे काळ घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरून माघारी येत नाही, तर आयुष्यायतल्या या काट्याला माघारी फिरायचे माहीतच नाही,त्याला फक्त पुढे जायचे आणि आता आपले काम करायचे एवढेच समजते.म्हणून सांगते थोडासा वेळ आठवा स्वतःचे बालपण ...! खूपच खट्याळ होते ना ? नक्कीच