Marathi Quote in Poem by Triveni Sable

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

आयुष्याच्या संध्याकाळी
कर्माची गोळा बेरीज करताना
अपुर्ण स्वप्न जाब विचारतात
वेळी अवेळी हिच खंत सलते


आयुष्याच्या चढ उतारात
अलगद हात काही सुटले
अपुर्ण वचने जाब विचारतात
वेळी अवेळी हिच खंत सलते


प्रेम तर होते मनात
अंहकारापुढे हताश हरले
अपुर्ण भावना जाब विचारतात
वेळी अवेळी हिच खंत सलते


आनंदी सगळ्यांना ठेवायचे होते
प्रयन्त कुठे तरी कमी पडले
अपुर्ण अपेक्षा जाब विचारतात
वेळी अवेळी हिच खंत सलते



घरासाठी जगत होते
स्वतःसाठी जगायचं राहुन गेलं
माझ्यातली मी जाब विचारते
वेळी अवेळी हिच खंत सलते


-✍️त्रिवेनीता❤️❤️

Marathi Poem by Triveni Sable : 111697454
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now