contact & connection
संपर्क आणि लगाव..
एकदा स्वामी विवेकानंद यांचे न्यूयॉर्कमध्ये व्याख्यान होते.. व्याख्यान अगदी सुरेख पार पडल्यानंतर तेथील पत्रकारांनी त्यांना गाठलेच...
प्रश्न प्रतिप्रश्न करत त्यातील एका पत्रकाराने त्यांना विचारले की ,साधुमहाराज आज तुम्ही कॉन्टॅक्ट आणि कनेक्शन म्हणजेच तुम्ही आताच्या व्याख्यानात संपर्क आणि लगाव याविषयी बोललात ,पण हे गोंधळात टाकणार आहे...
या दोन्हीतला नेमका काय तो फरक तेवढा समजावून सांगाल काय...???
तेव्हा स्वामींनी मंद स्मित करत उत्तर देण्याऐवजी त्याला वेगळाच प्रश्न विचारला,
स्वामी: तुम्ही न्यूयॉर्क चे रहिवाशी आहात का ???
पत्रकार ::एस ,एस, प्रॉपर इथलाच आहे मी ...
स्वामी : तुमच्या घरी कोण कोण असतं..???
पत्रकाराला वाटलं ,आपल्या प्रश्नांचे उत्तर टाळण्यासाठीच हे साधू बाबा काही जुजबी प्रश्न विचारत आहेत..कारण त्याचा प्रश्न तर सार्वजनिक होता आणि हे साधूबाबा तर काही तरी खाजगी विचारत आहेत..
तरी मूळ प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी च्या आशेने तो त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत गेला...
तो म्हणाला: माझी आई या जगात नाही ...त्यांच्या पश्चात आम्ही तिघे बहिण भावंड आणि वडील आहे..
सगळ्यांची लग्न झाली असून सर्वांचे सेप्रेट बंगले आहेत.. आम्ही सर्वच जण सेटल आहोत...!!
स्वामी: तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलता का ???
(आता मात्र त्या पत्रकाराला या प्रश्नाचा राग येत होता..)
स्वामी : तुम्ही तुमच्या वडिलांना शेवटचं कधी बोललात??? का काही आठवतंय का !!!
आपला मुळ राग आवरता घेतच त्या पत्रकारांनी उत्तर दिले, साधारणतः एक महिना झाला असावा..!!!
स्वामी : तुमच्या बहीण भावाचे एकत्रपणे गाठ भेट कधी झाली होती ???एका कुटुंबाप्रमाणे तुम्ही एकत्र कधी राहिलात..???
आता पत्रकारलाही घाम यायला लागला की मुलाखत कोण कोणाची घेते आहे???
तरी सावरतच तो म्हणाला ,गेल्या ख्रिसमस मध्ये एकत्रित वेळ घालवला सर्वांनीच...!!!
स्वामी : त्यावेळी तुम्ही किती वेळ म्हणजे किती दिवस एकत्र घालवले??
पत्रकार आता हळवा होत म्हणाला ,साधारणता तीन दिवस...
स्वामी : तुम्ही बहिण भावांनी त्या काळात किती वेळ आपल्या वडिलांबरोबर अगदी जवळ बसून घालवला..????
स्वामी : तुम्ही तुमच्या वडिलांसोबत सकाळचा नाष्टा ,दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण केलेत का... ???वडिलांना विचारलं का की तुम्ही कसे आहात.. ???आईच्या निधनानंतर ते एकटे जगत होते तर तो वेळ त्यांनी कसा घालवला...???
असं म्हणत स्वामीजींनी त्या पत्रकाराला आपुलकीने जवळ घेतलं..." बेटा तू नाराज होऊ नको आणि लाजिरवाणानाही होऊ नको..!!! तुला नकळत मी दुखावला आहे ;तरी मी तुझी मनापासून माफी मागतो ...पण या उलट प्रश्नातच तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे...
कॉन्टॅक्ट आणि कनेक्शन....!!!
तू तुझ्या वडिलांच्या कॉन्टॅक्ट मध्ये तर आहे पण तुझं त्यांच्याशी भावनिक कनेक्शन नाही...!!!
you are not connected with him.!!!
वडील संपर्कात असणं वेगळं आणि त्यांच्याशी लगाव असणं हा वेगळाच...🚑
कारण कनेक्शन हे नेहमीच आत्म्याचं आत्म्याशी होत असतं...💞 एकत्र बसणे भोजन करणे एकमेकांसोबत वेळ घालवणे...!!! एकमेकांची काळजी करणे एकमेकांच्या डोळ्यात बघून डोळ्यांनी संपर्कात नसून डोळ्यांची भाषा ओळखणे.. ;त्यानुसार प्रतिसाद देणे ,आपुलकीचा स्पर्श हात हातात घेणे इत्यादी कनेक्शन मध्ये येतं कॉन्टॅक्ट मध्ये येत नाही...!!!💕
तुम्ही आणि तुमचे भावंड एकमेकांच्या contact मध्ये तर आहात पण तुमच्या मध्ये असं कुठलंच connection नाही...!!!
आता पत्रकाराच्या डोळ्यात पाणी यायला लागलं.. एक चांगला धडा गिरवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानून त्या पत्रकारांनी त्यांना नमस्कार करून निघून गेला..
आपण एकमेकांच्या संपर्कात तर आहो, पण कुणाचं कुणाशी कुठलाही लगाव नाही...!!!
कसला संवाद नाही, कुठली चर्चा काहीच नाही...!!!
सगळेच स्वमग्न झाले आहेत आणि आपणही वरचेवर बदलत आहोत...
हेच खरं !!!!
आपल्या आई वडिलांनी शिकवलेले सगळं विसरत चाललो
✍️✍️💞Archu💞