पेटली शेकोटी
ऊब मनाला मिळाली
स्नेहाच्या भावनेने
संक्रांती सजली!
उसाचा गोडवा
नात्यांना लाभला
ऊतू गेल्या दुधाने
सूर्यदेव व तोषला!
गायी गुरे सजली
झूल अंगावर ल्याली
काळ्या मातीची लेकरं
कोठारी बैसली!
देते कुणी वाण
सुगडात भरलेले
तिची समृद्धी पाहून
देव गाभारी हर्षले!
कुणी नाच करी
विसरून जन-मन
घ्या आनंद सारे
विसरून आत्मभान!
जळून जावे दुःख
सुख यावे दारी
संक्रमणाचे पर्व
सांगते गोष्ट न्यारी!