.........वादळ...!
..छोटी मोठी..वादळे तर खुप आली आयुष्यात..आजपर्यंत..
..छोट्या वादळातुन..तर सहजच पार पडले
................काही ही न गमावता...
.................अगदी सहीसलामत..!!!
..मोठ्या वादळांनी शिकवले..
....... स्वतःचा बचाव करुन ..परत उभारी धरायला..!!
..पण आता तुझ्या निघून जाण्याने जे वादळ आलय..घोंघावत..!
त्यानं मला पार सैरभैर..केलय रे..
"बचाव"..आणी "उभारी"..
हे तर सारे दुरच राहिलेय.....................
मी स्वतःलाच कोंडुन घेतलय..माझ्या कोशात..
.........पाकळीही न उघडता..!!!!
....................... वृषाली