Marathi Quote in Motivational by भावना कुळकर्णी

Motivational quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

माणसं स्क्रु सारखी ..परिस्थिती नटबोल्ट
कधी परिस्थितीमध्ये चपखल बसतात, तर कधी सारखी घरंगळत जातात..एखादा स्क्रु वर्षानुवर्षे निघत नाही. तो आहे त्या स्थितीत तसाच असतो .एखादा सारखा सारखा बाहेर पङू बघतो मग त्याला कशाचे तरी वेसण लावून बांधायला लागतं. हे वेसण कधी माणसांचे, कधी परिस्थिती परत्वे बदलते.काही आजाराने गंजून जातात ,तसेच कुणी त्यांची काळजी घेणार असलं तर ते ऑईलिंग करुन आल्यासारखे आयुष्यात चपखल बसतात.पण कुणाचेच लक्ष नसेल तर खितपत पङणारया स्क्रु सारखे गंजून झिजतात आणि नाहीशे होतात.परिस्थिती बघून त्याप्रमाणे आपण स्रक्रु बनुन चपखल बसलो की आयुष्याला दुसरी कुठली जोङ दयावी लागत नाही.

भावना कुळकर्णी
नाशिक

Marathi Motivational by भावना कुळकर्णी : 111615503
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now