#नणंद #
👸👸👸👸
नणंद भावजयी नात्याचा 'आहो वन्स' पासून
'अहो ताई' मार्गे सुरू झालेला प्रवास,
'अगं ऐक ना' पर्यंत कधी झाला हे कळलंच नाही
कित्येक पिढ्यांना ह्या नात्याचं गमक वळलच नाही।
नणंद नाही फक्त एक शब्द किंवा फक्त नातं
नणंद असते एक अलवार जोडणारा धागा
माहेर सोडून आलेल्या नव्या नवरीची
परक्या घरात विसाव्याची जागा।
नंणदेत शोधू नये बहिणीची माया किंवा मैत्रिणीची छाया
शोधायचच असेल तर शोधा
बहिणीच्या मायेचा न मैत्रिच्या छायेचा
एक भरभक्कम पाया।
नणंदा असाव्यात घरोघरी,
कारण त्या असतात
नवऱ्याच्या बालपणीच्या आठवणींची
एक चालती बोलती तिजोरी।
नवऱ्याच्या मनगटावरच्या राखीसाठी...
पोरांच्या ' आत्तु, आत्तु' लडिवाळ हाकेसाठी...
बहिणीसोबतच अजून एका विसाव्यासाठी...
रुसण्यासाठी,भांडण्यासाठी,मनभरून गप्पांसाठी..
गरजेला सासूसॊबत ताडजोडीसाठी..
एक तरी नणंद हवी सासरच्या अनोळखी प्रवास
हातात हात घेऊन सोपा करण्यासाठी......!!!
©हर्षदा