💖💫बाबा💫💖
बाबा म्हणजे उंबराच झाडं असतं
लपलेल्या भावनांचं
जणू खोड असतं...
बाबा म्हणजे समुद्रातलं जहाज असतं
खंबीर आधाराचं
दुसरं नावं असतं...
बाबा म्हणजे मूलीचं काळीज असतं
तिचं सर्वस्व
या माणसातचं असतं...
बाबा म्हणजे काळजी करणारं मन असतं
कुटुंबासाठी लढणारं
अंतःकरण असतं...
बाबा म्हणजे मुलीचं छोटंस जग असतं
हवं हवंस वाटणारं
स्वप्नातलं सुंदर गाव असतं...
बाबा म्हणजे वादळातलं घरं असतं
स्वतःवर वार झेलणाऱ्या
आश्रयदात्याचं रुप असतं...
❤💯❤
-aaruu_creations