प्रिय चहा,
घरी आले भरपूर पाहुणे
त्यात कोण आहे पहा
पहिल्यांदा पाणी देऊन
पिण्यासाठी द्यावे चहा
चहामुळे वाढते आपल्या
सर्वांमध्ये प्रेमळ संवाद
उठणे बसणे वाढत राहते
राहत नाही कुठला वाद
मित्र भेटले रस्त्यात कुठे
म्हणती चल दोस्ता चहा घेऊ
चहा पितांना होतात गप्पा
निरोपात बोलती भेटत राहू
नवरी मुलीला पाहायला गेले
ती ट्रे मध्ये येते चहा घेऊन
लाजते जराशी बसते खुर्चीवर
नवऱ्या मुलाला चहा देऊन
चहाची महिमा लई न्यारी
घरातील सर्वाना ती प्यारी
सकाळ सायंकाळ प्यावे वाटे
पावसात लागे खूपच भारी
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
9423625769