#मौल्यवान
मानवी जीवन हे खूप मोलाचं आहे. या मौल्यवान जीवनातला प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. आयुष्यातला येणारा पुढचा क्षण कसा असेल, तो काय नवे आव्हान किंवा नवी संधी आपल्यासमोर घेऊन येईल याबद्दल काहीच सांगता येणार नाही. अशा अनिश्चित आयुष्यात आनंदी आणि समाधानाने जगण्यासाठी प्रत्येक क्षण समरसतेने जगणं आवश्यक आहे. भूतकाळात घडलेल्या गोष्टींचे ओझे अलगद मागे सोडून आणि अनिश्चित भविष्यकाळाबद्दल कोणताही विचार मनात न आणता सध्या समोर असलेला मौल्यवान क्षण आंनदाने साजरा करण्याचा प्रयत्न करणे हे आनंदी व समाधानी जीवनाचे रहस्य आहे!
तेव्हा हे मौल्यवान जीवन फक्त आणि फक्त आनंदात रहाण्याचा संकल्प आजच्या या शिवराज्याभिषेक दिनी करूया!
©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020.