#Rightकोरोना मुळे अचानक सुट्टी जाहीर झालेली असली तरीही मझ्या मुलांची परीक्षा नुकतीच संपलेली असल्याने मुले घरीच होती आणि परीक्षेचा ताण संपवून सुट्टीची मज्जा चाखण्यास सज्ज झालेली होती.त्यात आई बाबा हि घरीच म्हणजे सोने पे सुहागा,उशिरा पर्यंत लोळणे,आवडते सिनेमे घरीच बघणे,अशा कार्यक्रमांची रेलचेल झालीच.मुलगी आता दहावीत गेल्याने ती नवीन पुस्तकांच्या दुनियेत मस्त रमली,पण मुलगा सहावीत गेला,म्हणजे अजूनही थोडे बोआर होण्याच्या टप्प्यात होताच.मग काय !या वाढलेल्या सुट्टीच्या पर्वणीत मुलांचे नेहमीसारखे स्वावलंबनाचे धडे सुरू झाले,एरव्ही शाळा अभ्यास या मुळे काही गोष्टीची सक्ती मुलांना करता येत नाही कारण ते ही खूप थकलेले असतात,पण आता मात्र माझा मुलगा मलय मला छान घरकामात ही मदत करतो,थोडी भांडी असल्यास घासून धुवून जागेवर ठेवणे,कपड्यांच्या घड्या घालने,कपड्यांना साबण लावून देणे,साफ सफाई अशी कामे आनंदाने करतात दोघे भाऊ बहिणी.सतत फक्त समानतेच्या बाता ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर देणे मला योग्य वाटते,म्हणून अमुक कामे मुलांची अमुक मुलींची असा भेद मुलाच्या मनाला स्पर्शू ही न देण्याची आयती संधी मी सोडेल का?.
खेळ,कला ,कागद काम या बरोबरच घरातील सर्वांनी एकत्रित काम करत आनंदात वेळ घालवण्याची संधी कडे सुसंधी म्हणून बघण्याची सकारात्मक दृष्टी आपणच मुलांना दिली तर कशाला बोअर होतील मुले.
मनीषा चौधरी - वाघ , नाशिक
9359960429