Marathi Quote in Poem by Pallavi Laxmikant Katekar

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

गझल- भास...

तुझ्याच सावलीची मज साथ आहे, तुझ्याच पावलांची मज वाट आहे.

स्मरणात मी ना आता हे जाणतो तरीही, तुझ्यात झुरण्याची अतृप्त प्यास आहे.

पंखात बळ आता घेऊ मी कुणाचे?,डोळ्यात प्राण आता आणू मी कुणाचे?

राहिला ना सूर माझा हे जाणतो तरीही, गाण्यात माझ्या मजबूर आस आहे.

वेचतो नभातले कण निखळत्या चांदण्याचे, मनात मोजतो क्षण तुझ्या भेटण्याचे.

नसणार तू ना आता हे जाणतो तरीही,डोळ्यात झुरणारा अलवार भास आहे.

डोळ्यात झुरणारा अलवार भास आहे.
-पल्लवी काटेकर

Marathi Poem by Pallavi  Laxmikant Katekar : 111215282
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now