हैशटॅग #KAVYOTSAV -२
भावनाप्रधान
३) बाप
आईविना पोर मी, माझ्या बापाने जपले
माझ्यासाठीच त्याने दुसरे लग्न नाही केले
सावत्र आईचा जाच नको मला
यासाठी त्याने जीवन त्याचे वेचले
माझा बाप आणि मी ही जोडगोळी
जणू पुरणाने भरलेली मधुर पुरणपोळी
माझ्या मनातील व्यथांना चेहरा पाहून वाचतो
गालातील हास्यासाठी दिवसरात्र खपतो
मनमिळावू स्वभावाने दिसतो एकटा अभावाने
माणसांच्या गर्दीतून हाक मारतो प्रेमाने
परोपकार हाच त्याचा खरा धर्म
मेहनतीने कमावणे हेच त्याचे कर्म
शिक्षणासाठी माझ्या शेतीवाडी विकली
नोकरी लागावी म्हणून कर्जबाजारी केली
माझ्या इच्छा आकांक्षा हेच त्याचे ध्येय
तो नुसता बाप नाही, तोच सर्वकाही
अशा माझ्या बापासाठी, जीव ठेवला गहाण
तरी मला वाटतं, माझाच वाटा लहान
हैशटॅग #KAVYOTSAV -२
प्रेरणादायक
४) सारीपाट
जीवन हा सारीपाट
सुख आणि दुःखाचा
हसावे की रडावे
जगावे की मरावे
पण कीर्तिरूपाने उरावे
प्रयत्न आपण करावे
अडचणी, अडथळे
येतील पदोपदी
त्याच बनतील
जीवनाची सप्तपदी
मार्गातील वाटा
वाटतात रुंद
प्रयत्नांनी कराव्यात
आपणच अरुंद
यश, अपयश
मिळणारच नक्की
मनाशी बांधा
खूणगाठ पक्की
केलेले व्यर्थ जात नाही
केल्याशिवाय होत नाही
प्रयत्न करा, यशस्वी व्हा
जीवनाचे नंदनवन पहा