हैशटॅग # KAVYOTSAV -२
२) प्रेम
माझ्या समोरून ती गेली
तिच्या केसांची बट कशी झुलली
तिला पाहून माझ्या नसानसातून
बिजली प्रेमाची कडाडली
तिचे ते गोड हास्य
खुणावते माझ्या यौवनाला
भुरळ घालते माझ्या मनाला
जागवते चेतनांच्या फुलाला
रोज रोज तिचे दर्शन
कावराबावरा होतो जीव
तिला पाहिल्याशिवाय मात्र
वाटत नाही मी सजीव
आठवणींच्या हिंदोळ्यावर
ती प्रेमाची मुर्ती
पाहताच चढते कैफ
वासनेची होते पूर्ती
गुलाबी ओठांना स्पर्श करता
सुखाचा सागर वाहू लागतो
तिच्या डोळ्यातील पाण्यात
माझा चेहरा मी पाहतो