#Kavyotsav -2
1.जीवन जगण्याची प्रेरणा
जीवन इतके सुंदर आहे की, जगून दाखवा,
काहीही सोसावे लागले तरी संपवु नका.
जीवन जगणे जर इतकेच सोपे असते,
तर रडत रडत आपण जन्माला आलोच नसतो
आणि जीवन जगणे जर इतकेच सोपे असते,
तर दुसरयांना रडवुन आपण या जगातुन गेलोच नसतो.
शेवटी जीवनात कितीही दुख आले,कितीही
सोसावे लागले, तरी एकांतातच रडावे लागते,
पण मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवुन,लोकांमध्ये मात्र हसावं लागतं.
आपल्या जीवनातला अंधार संपवुन,सुर्याला नवीन आव्हाहन करा,
बघा तो तुमच्या जीवनात एक नवी सकाळ घेऊन येईल.
म्हणुण एकदा तरी आपले जीवन जगून बघा.
एक नवीन उम्मीद घेऊन ,प्रकाशाच्या दिशेने जाऊन बघा.
कारण जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो...
पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही ,
हे कायम लक्षात असु द्या.
2. देवाचा शोध
देवाचा शोध
देवाचा शोध
देवा तु खरंच या जगात आहेस का?
कोणी तुला एखाद्या दगडात बघुन,त्यालाही तुझे रुप दिले जाते.
कुणाच्या मते मंदिरात तु असतोस,
तर कुणाच्या मते निसर्गातल्या एखाद्या छोट्याश्या अंशात.
पण मला मात्र प्रश्न पडतो तु खरंच आहे का?
कधी तर असे वाटते,ही मुळीच अंधश्रद्धा तर नाही.
हिंदूच्या मते परमेश्वर तु असतोस,मुस्लिमांच्या मते
अल्हा तु असतोस.
तर ख्रिश्चनांच्या मते येशु तु असतोस.
पण माझ्यामते देव ही संकल्पना मुळी वेगळीच.
मला एखाद्या गरिब व्यक्तीला मदत करणारयात तु दिसतोस
एखाद्या हंबरणारया वासरातही मी तुलाच बघते.
एखाद्याचा जीव घेण्यापेक्षा दुसरयांना जीवनदान
देणारयात मला तु दिसतोस.
सकाळी उगवणारया सुर्यातही मला फक्त तुच दिसतोस.
म्हणूनच कधी कधी तुझा घ्यावासा वाटतो शोध.