#kavyotsav2
प्रिय लेखिका....
तुझ्या कथां मधून
तुझ्या कवितांमधून
मला तुझं मन कळतं....
तुझ्या कवितेची प्रत्येक ओळ
माझ्यासाठीच आहे अस मला वाटतं....
तुझ्या कथा कविता वाचताना
मी माझ्या ही नकळत तुझा होवुन जातो....
त्या शब्दांच्या आड मला तुझा
चेहरा दिसतो....
कस काय गं जमतं तुला
एवढं सुंदर लिहायला....
शब्दांच्या माध्यमातून
असं मनसोक्त व्यक्त व्हायला....
तुझ्या कथेतल्या राजकुमार राजकुमारी
सारख आपलं ही नातं जुळाव....
मी ही एक कविता करून
माझ्या मनातलं तुझ्या समोर मांडाव....
तुझ्या इतकं छान जरी लिहिता
येत नसलं मला....
तरी माझ्या कवितेतल्या प्रत्येक शब्दा मागची भावना कळावी फक्त तुला....
कळावी फक्त तुला....
माझ्या पहिल्या कवितेतून व्यक्त
झालेलं माझं पहिलं प्रेम तु......
- मनिष चांदले