#kavyostav -2
आठवण...
आठवतो अजूनही मला
शब्द तुझा तो फिरलेला
आणाभाका शपथा नी
निश्चय हवेत विरलेला
काळ होता छान किती
उत्साहाने अती भारलेला
दुनियेत कल्पनांच्या त्या
फेरफटका मारलेला
साथ सुटली कायमची
कच्चा धागा एक उरलेला
आज अचानक हाती आला
साठा आठवांचा पुरलेला
..... प्रल्हाद दुधाळ
9423012020