*प्रसंग छोटा पण संदेश आयुष्याचा*
एक स्त्री तिच्या सहा वर्षाच्या मुलासोबत रेल्वेने प्रवास करत असतात. दरम्यान ते दोघेही पुस्तक वाचत असतात. त्या दोघांना पाहून इतर प्रवासी अचंबित होतात.
एक प्रवासी उत्सुकतेने त्या स्त्रीला विचारतो, *"ताई, सध्याच्या काळात जे मूल काल जन्मले ते आज स्मार्ट फोन सोबत खेळताना दिसते. अन तुमचा हा मुलगा चक्क पुस्तक वाचतोय, कसं काय शक्य आहे हे? हा मुलगा स्मार्ट फोन किंवा टॅब वर गेम खेळत नाही. तो तुमचं ऐकतोच कसं ? अन तुम्ही हे कसं शक्य केलं?"*
यावर त्या स्त्रीने स्मित हास्य करत शांतपणे उत्तर दिले, *"दादा, मुलं आपलं ऐकत नसतात हे खरं असलं तरी मुलं आपलं अनुकरण करतात हेही तितकेच सत्य आहे."*
*वाक्य छोटं आहे पण,*
*अर्थ खूप मोठा आहे.*
cp