Marathi Quote in Song by Dipak Ringe ।बोलका स्पर्श।

Song quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

ती....!

जीवनाच्या वाटेवर चालायला
शिकवणारी ती
कधी स्वतःचा सुखाचा
विचार न करणारी ती
 
पृथ्वीसारखी सगळी सुख-दुःखे
पोटात सामावून घेणारी ती
तुला खुश पाहावं म्हणून
सतत झिजत राहणारी ती

जन्माच्या पहिल्या दिवसापासून
शिकवत आलेली ती
निस्वार्थीपणाचा कळस
असणारी ती...

स्वतःची दुःखे फेटाळून
तुझी दुःखे सावरणारी ती
तू दिलेली दुःख
न मोजणारी ती..

काय केलं तुझ्यासाठी आणि
तू काय केलं माझ्यासाठी
अशा स्वार्थी विचारांना
मनात स्थान न देणारी ती

संकटाना एकटी सामोरी जाणारी ती
वेळप्रसंगी कालीचे रुप घेणारी ती
विद्येची देवी सरस्वती ती
शांतता राखून ठेवणारी लक्ष्मी ती

तृप्त आत्म्यासारखी रक्षा करणारी ती
ईश्वरासारखी तुझ्यापाठी खंबीर राहणारी ती

ईश्वररुपी जीवनात कार्यरत असणारी ती एकमेव देवी म्हणजेचं "आईच" ती....

"आ" म्हणजे "आत्मा"
"ई" म्हणजे "ईश्वर"







©दिपकरिंगे

Marathi Song by Dipak Ringe ।बोलका स्पर्श। : 111073937
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now