Marathi Quote in Blog by SHRIKANT PATIL

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

मृत्यूस आज जरा मी,  थांब सांगतो आहे
जगणं अजूनी राहिले  , जगून  पाहतो आहे||

संसार हा सुखाचा,क्षणभंगूर जीवनाचा
आहे युध्द संकटाशी ,लढून पाहतो आहे||

साथ ही या पिलांना, माझी चार दिसांची
आकाशी झेप घेण्या,पंखास बळ देत आहे||

जीवन वाटेवरी या,भेटली माणसे त-हेची
गर्दीत आज माणसांच्या,  'माणूस' शोधतो आहे||

चढलो कितीही शिखरे, नव्या नव्या यशाची
तरीही तुला जिंकणे,अजून शिकतो आहे||


-श्रीकृपा

Marathi Blog by SHRIKANT PATIL : 111067238
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now