पहिली माझी ओवी! देवाजीच्या पायी!
फुलांची ओंजळ! त्याच्यासाठी!!
दुसरी माझी ओवी! झाडापानांसाठी!
त्यांच्या सोबतीने! पक्षी राहती!!
तिसरी माझी ओवी! शेतीभातीसाठी!
धरतीच्या कुशी! हिरवी बाळे!!
चवथी माझी ओवी!चवतीचा चांद!
मळ्यात आपुल्या ! कष्ट करी!!
पाचवी माझी ओवी! चंद्राची चांदणी!
खेळे माझ्या अंगणी! रातदिन!!