भय न वाटे मला
रात्र अंधारी किर्र काळोख
न दिवा न मशाल
तरी भय न वाटे मला ।
विचार घट्ट मनाशी
अंधार नसे मज सरशी
म्हणूनी भय न वाटे मला ।
मी माझाच सोबती
एकटा नसे मी कधी
म्हणुनी भय न वाटे मला।
कुणाची भीती ? कसली भीती ?
माझ्यात मीच शक्तिशाली
म्हणुनी भय न वाटे मला ।
कोण मला भिडे? कोण करे का रे?
माझा मीच पाठीराखा
म्हणुनी भय न वाटे मला ।
कोण नसे माझा
मीच माझा बरा
एकला आलो मी जगात
एकला चाले वाट
भय पार करून पलीकडे मी आलो
मग भय कसले मला ।
- shivanita