तशीच असशील तू !!!
अगदी तशीच असशील तू,
थोडी खोडकर, थोडी मनमिळावू
थोडी अल्लड , थोडी भावनिक
स्वतःच दुःख लपवून दुसऱ्याला हसवणारी,
पण मनातल्या मनात कुठे तरी रडणारी,
अगदी तशीच असशील तू
घरच्यांवर जीवापाड प्रेम करणारी,
त्यांच्या स्वप्नांसाठी जगणारी आणि झटणारी,
जबाबदारीचे झोखड खांद्यावर घेऊन राबणारी,
आणि सतत समोरच्याच्या आनंदाचा विचार करणारी,
अगदी तशीच असशील तू
एक स्वतंत्र पक्षासारखी उत्तुंग झेप घेणारी,
स्वप्नांचा पाठलाग करताना जबाबदारीची जाणीव असणारी,
मनाशी ठाम आत्मविश्वास बाळगणारी आणि
गुपचूप कोणावर तरी प्रेम करणारी !!!
अशीच आहेस ना तू ?
अक्षय सानप