Marathi Quote in Blog by Tejal Apale

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

काय आहे मृत्यू?

एक कटू सत्य.सर्वपरिचित पण तरीही तेवढच भयानक.मनुष्य जन्म घेऊन या भूतलावावर येतो आणि मृत्यू हा त्या जीवनाचा शेवट ,वर्षानुवर्षे चालत आलेलं हे निसर्गाचं चक्र .वैद्यानिक दृष्ट्या  साधं आणि सरळ. पण खरंच मृत्यू एवढा साधा असतो?

एखाद्याच्या जन्माने सगळीकडे आनंद पसरतो,शरीरातील नसानसात रोमांच संचारतो. कारण तिथे एक नवं आयुष्य सुरु होणार असत. एक जीव लहानाचा मोठा होतो.बोबडं बोलून ,धडपडत चालायला शिकत.हे सगळं फक्त त्या जीवाशी मर्यादित नसत.तर त्या लहानच मोठं होण्याऱ्या जिवाबरोबर त्याच्या भोवतालचे लोकही ते सगळं जगत असतात.त्याच्या लहानपणात तेही लहान होतात आणि पन्नशीच्या वयातही पाच वर्षाचा असल्याचा अनुभव घेतात.पण मृत्यू या सगळ्याच्या विपरीत आहे. धड्पडलेलं लेकरू उठून पुन्हा उभं राहत पण मृत्यूनंतर माणसाची सावलीही राहत नाही.जस एका जन्माने त्याच्या भोवतालच्या  आवडत्या व्यक्तींचा जन्म होतो तसेच एका मृत्यू ने त्याच्या आसपासच्या लोकांच्या भावनांचा हि मृत्यू होतो.

पण शेवटी जन्म आणि मृत्यू ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.जो जन्मला तो मरणारच.पण या दोहोंमधील जे अंतर आहे ते आयुष्य आहे.जेव्हा जन्म घेतो तेव्हा आपल्याकडे काहीच नसत.ना शब्द ना ओळख,पण जगण्याची इच्छा आपल्याला सगळं काही देत नाव,यश आनंद, नाते आणि त्याचबरोर दुःख,अपयश सुद्धा. अनेक प्रयत्नांनंतर जेव्हा अपयश येत तेव्हा आपल्याला मृत्यू सोपा वाटतो.अनेक दुःखांना जेव्हा समोर जावं लागत तेव्हा आपल्याला मृत्यू सोपा वाटतो.हि माणसाची मानसिकताच आहे.पण आयुष्यच गणित समजलं तर फार सोपं आहे.फक्त आयुष्यात काय मिळवायचं आणि काय वजा करायचं ते मात्र कळायला हवं .एखाद्या गोष्टीसाठी शंभर वेळा प्रयत्न करूनही ती मिळत नसेल तर थांबायचं नाही  कारण कदाचित एकशे एक वेळानंतर ती मिळणार असेल! दुःख मिळालं म्हणून आपण श्वास घ्यायचं थांबत नाही तर मग प्रयत्न तरी का थांबवायचे.जीवनात कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर ती मिळवण्याच्या ध्यास स्वतः मध्ये असला पाहिजे.कावळ्यांनी किती हि ठरवलं तरी तो गरुडझेप घेऊ शकत नाही कारण आकाशाला गवसणी घालण्याची  जिद्द गरुडाला मुळातच असते.


म्हणून कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर आधी स्वतः मध्ये तशी इच्छा जागृत व्हायला हवी.कारण आपण अंड्याला बाहेरून कितीतरी फूट म्हटलं  तर ते फक्त फुटेल. पण जर ते अंड स्वतः फुटलं तर त्यातून एक जीव बाहेर येतो हे आहे आयुष्यच गणित .जोपर्यंत तुमचा श्वास चालू आहे तोपर्यंत तुमचे प्रयत्न चालू असायला हवे.जर प्रयत्न थांबले तर तो जिवंतपणी आलेला मृत्यू आहे.

ज्या लोकांमध्ये आपण वावरतो,पूर्ण आयुष्य घालवतो ते लोक मेल्यानंतर स्मशानात घेऊन जातात आणि ते प्रेत जाळतात.त्या जळणाऱ्या ज्वाला प्रेतावर आपलं अधिराज्य गाजवतात .आणि कवटी फुटली कि सारे नातेवाईक परत फिरतात.ज्या शरीराला आयुष्यभर आपण एवढं जपतो शेवटी ते राख होत आणि मागे उरत ते फक्त आपलं नाव.म्हणून जगताना असच जगा कि मृत्यूनंतर हि तुमचं नाव जिवंत राहायला हवं.सतत प्रयत्न करा स्वतःला एवढं मोठं बनवा कि मृत्यू हि तुम्हाला मारू शकणार नाही.आणि स्वतःला मोठं बनवताना नैतिकता जपा.कारण व्यक्ती तीच मोठी असते जिला भेटल्यानंतर कुणी स्वतःला लहान समजणार नाही.

मृत्यू हे पृथ्वीवरच एक अपरिहार्य सत्य आहे.आपण मेहनत करतो कारण त्याच्या शेवटी यश असत,आपण यशावर प्रेम करतो म्हणजेच शेवटावर प्रेम करतो.त्यांच्याप्रमाणे जस जीवनावर प्रेम करतो तसेच मृत्यू वरही करा म्हणजे आयुष्य आणखी सुंदर बनेल.आणि मृत्यू नंतर तुमचं केवळ नाव न राहता एक आठवण म्हणून नेहमी  जिवंत राहील.

Marathi Blog by Tejal Apale : 111054623
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now