#LoveYouMummy
प्रिय,
आई,
"माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ". खरं तर हे सांगायची गरजच नाही. पण, ' मनात कितीही प्रेम असलं तरी ते मनात न ठेवता कधीतरी समोरच्या व्यक्तीला सांगावं ', असं समजावणारी तू मला आठवलीस, म्हणून सांगतेय.
तुझ्यावरचं माझं प्रेम अगणित, अमर्याद आहे. त्या प्रेमाला मी एखादी उपमा द्यावी असं शक्यच नाही. हे प्रेम सागरासारखं विशाल आहे असं नाही म्हणता येणार कारण कुठल्यातरी किनाऱ्यावर ते संपतं. आकाशासारखं अथांग ही नाही म्हणता येणार कारण क्षितीज नावाच्या आभासी जागेवर त्याचंही अस्तित्व संपतं. पण, तुझ्यावरचं माझं प्रेम कधीच संपत नाही, संपणारही नाही. इतकं ते अखंड आहे, अमर्याद आहे.
आपल्या आयुष्यात कितीही माणसं आली ना तरी आपलं एकमेकींवरचं प्रेम असंच राहणार आहे. पण आज पहिल्यांदाच मनापासून सांगावसं वाटलं म्हणून हे पत्र.
आशिर्वाद असू दे आई.