तू......
कधी शांत-प्रशांत,
अगदी सागरासारखा......
तर कधी उनाड वारा....
कधी भडभडून बोलणारा,
मुसळधार पावसासारखा,..
तर कधी निर्मन दगड....
कधी खूप गोंधळलेला,
या फूलावरून त्या फूलावर उडणार्या भुंग्यासारखा...
तर कधी स्थिर, खंबीर पर्वत...
कधी खळखळून हसणारा,
खळाळत्या नदीसारखा...
तर कधी कोमेजलेलं फूल...
कधी प्रेमाचा ओलावा भासणारा,
वाळवंटातील मृगजळासारखा...
तर कधी नुसताच कोरडा वाळवंट...
कधी आनंदाने हिरवागार झालेला,
नवपल्लवीत झाडासारखा...
तर कधी उभा रूक्ष वृक्ष....
आयुष्यातल्या अडचणींचा लपंडाव खेळणारा तुच...
निस्वार्थी वागणारा,
मदतीला धावणारा तुच.....
तु मोकळा की गुंतागुंत या कोड्यात सतत मला अडकवणारा तुच....
तुझ्या डोळ्यातल्या समुद्रडोहाचा ठाव ही लागू न देणारा तुच....
बोलका तरीही अबोल,
हसरा तरिही उदास,
भावनाशील पण भावनाशुन्य,
आनंदी पण दु:ख प्रामाणिकपणे लपवत असे अनेक बहूरूप घेणारा ही तुच.....
वाटतं सगळ्या रूपात जगावं,
तुझ्यासारखं नाही तर तुझ्यासोबत,
तुझ्या प्रत्येक गोष्टीत वाटेकरी होऊन....
वाटतं तुझ्यासोबत उडावं,
तुझ्या स्वप्नांना उडण्याचं बळ देऊन...
वाटतं तुझ्यातल्या तुला एकदा भेटावं,
मनापासून तुझं होऊन.....
सांग ना,
घेशील मला तुझ्या स्वत:त सामावून....???