#Kavyotsav
गुंता हा मनाचा सोडवू कसा सांग ना,
मनात उठलेलं वादळ शमवू कसा सांग ना....
तुझ्या जवळ असण्याचा सदा मला भास हा,
तुझ्या सहवासात रमण्याचा माझा अट्टाहास हा...
वेड्या मनाच्या वेड्या भावना समजावू कसा सांग ना,
मनात उठलेलं वादळ शमवू कसा सांग ना....
बकुळपुष्पाचं लावण्य प्रिये आहे तुझ्या रूपात जणू,
दवबिंदूचं निखळ रहस्य आहे तुझ्या नयनात म्हणू....
रूप तुझं न्याहाळण्याचा गुन्हा थांबवू कसा सांग ना,
मनात उठलेलं वादळ शमवू कसा सांग ना....
अमिर-गरिबीची आपल्यात उभी दिवार आहे,
नशिबाने माझ्यावर केलेला हा दर्द-ए-प्रहार आहे....
आयुष्य-नशिबाचा वाद हा संपवू कसा सांग ना,
मनात उठलेलं वादळ शमवू कसा सांग ना....
मनोमन वाटे निसर्गाची जादू न्यारी व्हावी,
अलगद् हळूवार पावलांनी तूच माझ्या दारी यावी.....
मनातल्या खुळ्या स्वप्नांना सत्यात उतरवू कसा सांग ना,
मनात उठलेलं वादळ शमवू कसा सांग ना.....
गुंता हा मनाचा सोडवू कसा सांगना...
मनात उठलेलं वादळ शमवू कसा सांगना.....