#Kavyotsav
मन अधीर हे कसे
का होते बरे वेडेपिसे
स्वप्नी बसे का मोरपिसे
निजतो देह चांदराती
परी मन का जागते
आठवता तुला जळतो जीव का
जणु प्रीतवेडा दिव्यासंग वाती
गुलाबी हसू लाल गाली
बघता क्षणी मी तुझ्या
रंग रंगली राधा जणू बावरी
देह कापूर अग्नी पेटला
चांदण्याराती तुझ्यात प्राण गुंतला
तुला भेटण्या का काहूर माजला
श्वासही अधीर हृदयी गोठला
लाख दिवे आरास मांडली
तुझ्या येत्या सोन पाऊली
स्वैर जीव तळहाती
तुजसाठी मोकळा सोडला
©दिपाली प्रल्हाद