#kavyotsav
||काळोखी रात्र||
तू एक काळोखी रात्र
विरह सहन करावा लागतो
तुला ही त्या मधुर चंद्र चांदण्यांचा
प्रखर किरणांच्या तेजापुढे
काही काळ तुलाही
समेटून राहावे लागते
सूर्यास्तासाठी असतेस तू कातुर
चंद्र चांदण्यांच्या मिलनास
असतेस तू आतुर
तू एक काळोखी रात्र.....
चंद्र चांदण्याने तू सजलेली
रातराणीच्या सुगंधाने तू भरलेली
किरकीर रात किड्यांच्या मंत्रोच्चाराने
तू मुग्ध झालेली
तू एक काळोखी रात्र....
तूच एक मात्र देतेस
थकलेल्या मनाला निद्रेची मात्र
व पुन्हा करवतेस नवचैतन्याची यात्रा
तू एक काळोखी रात्र....