माझी माय (निधन १२-११-१३)
माझी माय होती, घरा दाराची माई
स्वता:साठी कधी ती, जगलीच नाही
मन होते तिच, आभाळा ऐवढ मोठं
नव्हती त्यात, कसलीच खोट
नाही केला तिने, लहान मोठ्यात भेदभाव
जीवा पाड प्रेम करणे, हेच तिला ठाव
प्रत्येकासाठी केले तिने जीवाचे रान
दिवस रात्र केले तिने अन्नदान
घासातला घास, देई दूसऱ्याला
नाही पाहिले कधी, काय उरले तिला
दानधर्म करणे, आवडे तिला
हीच शिकवण दिली, तिने मला
कोणी कसे ही वागले, होती कर्तव्याची दासी
म्हणे लक्षात ठेवा, ज्याचे त्याच्या पाशी
नाही धरला तिने, कधी कोणाचा राग
प्रत्येकाच्या सुख दु:खात, घेत होती सहभाग
माझी माय होती, देशप्रेमी माई
झेंडा वंदनासाठी, नेहमी शाळेत हजर राही
कॅन्सर सारख्या आजारला, दिला ध्यैर्याने लढा
दृष्टीहीन होताच, वाचायला लागली मृत्यूचा पाढा
मृत्यू शैय्येवर ती म्हणे, सर्वांना खावू पिवू घाला
दूसऱ्यासाठी जगण्यातच, आनंद येई तिला
मी नेहमी म्हणे, दूसऱ्यासाठी होशील तू मेलेली जीवंत
तिच्या जाण्याची राहिल, मला आयुष्यभर खंत.
सौ. सुवर्णा चव्हाण
नागोठणे