#Kavyotsav
सांज
तुझ्या - माझ्या मधुर भेटीतली
स्वप्नातल्या मिठीतली
बेधुंद मिलनातली
सांज अशी ती आठवणीतली
चिंब होवुनी भिजण्यातली
बेहोश दोघांच्या गाण्यातली
अबोल ओठांच्या स्पर्शातली
सांज अशी ती आठवणीतली
दोघांच्या रुसव्या]फुगव्यातली
अतुट प्रेमाच्या बंधातली
प्रितीच्या नाजुक धाग्यातली
सांज अशी ती आठवणीतली
मनाला चटका लावुन जाणारी
खोटया तीच्या गैरसमजुतीची
तिच्या - माझ्या शेवटच्या भेटीतली
सांज अशी ती आठवणीतली
- पूनम माळी