#Kavyotsav
मैत्र... तिचं आणि त्याचं....
कधी असं झालं आहे!
जीवांचं मैत्र फुललं आहे!!
जनामनात सगळे म्हणत राहिले भलतं!
मला मात्र दिसून गेले वात्सल्याचे अर्थ!!
पहात होते दुरुन मी हे सारं काही!
त्या दोघांना त्याची कल्पनाही नाही!!
झाली ती कधी त्याची वात्सल्यमूर्ती!
थकलेल्या जीवाची क्षणभर विश्रांती!!
लेकरालाच कळते नं आईची माया!
त्याच्या निग्रही मनात दडली तिची छाया!!
कधी पाहिलं मी त्याला बाप होताना!
तिच्या प्रत्येक घटनेचा साक्षीदार असताना!!
वडिलांचा धाक, पण तेवढीच काळजी!
तिच्या अल्लडपणात त्याने घातली रूंजी!!
प्रेम ,स्नेह,माया,वात्सल्यही आहे!
त्या दोघांच्या नात्याला परिसस्पर्श आहे!!
असं नातं जेव्हा जडत घडत जातं!
बकुळफुलाच्या गंधाने आयुष्यच उजळवतं!!!