बांसुरी
(बांन्या सुभ्रा रीहान)
✍️ लेखक: राज फुलवरे
---
💠 अध्याय 1 — “बचपन की गलियाँ”
मुसाफिरपुरा के पुराने मोहल्ले की सुबहें हमेशा एक जैसी होती थीं —
चाय की भट्टी पर उठता धुआँ, बच्चों की स्कूल बस की आवाज़ें, और गली के कोने पर बैठे बांसुरी वाले बाबा की मद्धम तान।
वही बांसुरी की धुन हर सुबह मोहल्ले को जगाती थी।
---
🌿 बचपन की दोस्ती
उस गली में दो बच्चे बड़े हो रहे थे —
बानन्या और शुभ्रा।
बांन्या थोड़ा शरारती था, मगर दिल का बेहद साफ़।
शुभ्रा उससे ज़्यादा समझदार, पर भीतर से उतनी ही नादान।
दोनों की उम्र में बस दो साल का फ़र्क था, लेकिन समझो जैसे दोनों एक-दूसरे की दुनिया थे।
बांन्या के घर में एक बड़ा परिवार था —
पिताजी रघुनाथ, मेहनती दूधवाला;
माँ सुमन, दिनभर के काम के बाद भी मुस्कुराती और सबको संभालती और
दो बड़ी बहनें — कविता और रूतू ।
और उनका सबसे छोटा भाई सचिन, जिसे सब “सच्चा” कहकर बुलाते थे।
ग़रीबी थी, मगर हँसी कभी कम न हुई।
बांन्या अक्सर मज़ाक में कहता —
> “अरे अम्मा, तुझा पोळ्या सगळ्या गोल हाय पण माझी पोटाची भूक तरी कोनी गोल करणार का रे?”
सुमन हँसते हुए जवाब देती —
> “तू आधी कामाला लाग बाबा, मग भूक नाही तर बाई मिळेल जी रोज भरवेल तुला!”
घर में हँसी गूंज उठती।
---
🌸 शुभ्रा का घर
शुभ्रा का घर पास ही था। उसके पापा स्कूल में क्लर्क थे, माँ मंदिर में फूल बेचतीं।
घर छोटा था, पर वहाँ सलीका और संस्कार थे।
शुभ्रा और बांन्या बचपन से साथ खेलते — कभी गिल्ली-डंडा, कभी पकड़ा-पकड़ी।
कभी तो दोनों पेड़ पर चढ़कर आम तोड़ लाते और नीचे बैठकर खाते हुए झगड़ते।
> शुभ्रा: “ए बांन्या, तू सगळा खाल्लास!”
बांन्या: “अगं मी मोठा भाऊ आहे ना, मला जास्त हक्क!”
शुभ्रा: “हक्क म्हणे! मग माझं हृदय काय? ते पण मी तुला दिलंय ना!”
बांन्या (थोडा लाजून): “अगं, असं काही बोलू नकोस, आई ऐकली तर पोळी उलटी टाकेल!”
दोनों खिलखिला उठते।
---
🌤️ वो वादा
एक दिन दोनों ने मंदिर के पीछे वाली दीवार पर बैठकर कसम खाई —
> “हम हमेशा दोस्त रहेंगे… चाहे कुछ भी हो जाए।”
शुभ्रा ने छोटी सी राख की रेखा ज़मीन पर खींच दी और बोली —
> “जो भी इस रेखा को पार करेगा, वो मेरा नहीं रहेगा।”
बांन्या ने भी ज़मीन पर अपनी उँगली रखी —
> “तो ठीक आहे, पण जर तूच ओलांडली तर मी काय करायचं?”
शुभ्रा ने मुस्कुराते हुए कहा — “फिर पकड़ लेना मुझे… हमेशा के लिए।”
दोनों चुप हो गए।
वो पल जैसे हवा में रुक गया था — बचपन के भोले दिलों में कुछ अनकहा, कुछ अनसुना जन्म ले चुका था।
---
🌾 कई साल बाद
समय उड़ गया।
अब बांन्या कॉलेज में था, शुभ्रा भी बारहवीं कर रही थी।
मोहल्ला वही था, मगर दोनों के मन में अब नई भावनाएँ पनपने लगी थीं।
एक शाम दोनों ने मिलने का तय किया।
“कल मंदिर के पास वाली गली में मिलते हैं,” शुभ्रा ने धीरे से कहा।
“ठीक आहे, पण उशीर करू नकोस. नाहीतर मी तुला फोन नाही करणार पुन्हा!” बांन्या ने नकली गुस्से में कहा।
शुभ्रा मुस्कुरा दी — “फोन नहीं, तू खुद आ जाना।”
---
🌙 वो मुलाकात
अगले दिन हल्की हवा चल रही थी। गली के किनारे नीम के पेड़ से पत्तियाँ झर रही थीं।
शुभ्रा नीले रंग के सलवार में आई थी, और बांन्या उसे देखते ही थम गया।
> बांन्या (धीरे से): “एवढी सुंदर दिसतेस आज… लग्न आहे का तुझं?”
शुभ्रा (हँसते हुए): “हो, तुझ्याशीच!”
दोनों हँसे और साथ-साथ चलने लगे।
चलते-चलते उन्हें एक मीठी सी आवाज़ सुनाई दी —
बांसुरी की धुन…
इतनी मधुर कि जैसे हवा भी थम गई हो।
दोनों रुक गए।
सामने, नीले शर्ट में, एक लड़का बांसुरी बजा रहा था — रीहान।
---
🌬️ पहली नज़र का असर
रीहान की आँखों में गहराई थी, और होंठों पर सादगी।
धुन रुकते ही उसने दोनों की तरफ देखा, हल्के से मुस्कुराया और सिर झुकाया।
शुभ्रा जैसे खो गई थी उस स्वर में।
> शुभ्रा (धीरे से): “कौन है ये?”
बांन्या: “अरे याला मी ओळखतो. तो रीहान आहे — जुन्या शाळेतला मुलगा. बांसुरी वाजवणं म्हणजे त्याचं आयुष्य आहे.”
शुभ्रा: “इतना सुंदर बजाता है…”
बानन्या (थोड़ा मुस्कुराकर): “चल, तुझी ओळख करून देतो.”
---
वे दोनों उसके पास गए।
> बांन्या: “ए रीहान! किती दिवस झाले रे तुला पाहून!”
रीहान (हँसते हुए): “अरे बानन्या भाई! तुम्ही तर बदलले नाही जरा पण.”
बांन्या: “ही माझी फ्रेंड आहे — शुभ्रा. हिला तुझं बांसुरी ऐकून प्रेम झालंय वाटतं.”
शुभ्रा (थोड़ा शरमाकर): “असं काही नाही…”
रीहान (हलकं हसत): “प्रेम नाही तरी संगीताने हृदय स्पर्श केलं ना?”
तीनों हँस दिए।
वहीं से तीन दिलों की कहानी शुरू हो गई —
एक धुन, एक दोस्ती, और एक ऐसा प्यार जो वक्त को भी रुला देगा।
---
अध्याय 2 — “बांन्या का डर और रिहान की ज़िद”
सुबह का वक्त था। शहर की गलियों में हल्की ठंडी हवा बह रही थी। सड़कों के किनारे चायवाले की आवाज़ें, और रिक्शों की खड़खड़ाहट धीरे-धीरे गूंज रही थी।
बांन्या अपने कमरे के बाहर बैठा था — हाथ में पुरानी लकड़ी की बांसुरी, वही जो रिहान ने उसे तोहफे में दी थी। लेकिन आज उसके चेहरे पर मुस्कान नहीं, बल्कि गहरी चिंता की लकीरें थीं।
> बांन्या (धीरे से खुद से):
“रिहान... तू समजत नाहीये रे बाबा. डॉक्टरनं सांगितलं होतं तुला, फुफ्फुसात इंफेक्शन आहे म्हणे. पण तुला कुठं ऐकायचंय कुणाचं...”
इतक्यात शुभ्रा तिथे आली. तिच्या हातात गरम चहा होता.
> शुभ्रा (हसत):
“काय रे बांन्या, पुन्हा त्याचं नाव घेतोस का? सकाळ झाली, आणि तू अजून त्या बांसुरीवाल्याचं नाव घेत बसलास.”
बांन्या उठून तिच्याकडे बघतो.
> बांन्या:
“शुभ्रा, मी त्याचं नाव घेणार नाही तर कोणाचं घेऊ? तो माझा भाऊसारखा आहे. त्याचं बांसुरीवरचं प्रेम, त्याचं संगीतावरचं वेड… आणि आता तेच त्याला संपवणार आहे!”
शुभ्रा थोडा वेळ शांत राहिली, तिच्या डोळ्यांत काहीतरी दडलेलं होतं — एक गुपित, जे ती बांन्याला सांगू शकत नव्हती.
> शुभ्रा (हळू आवाजात):
“माहितीय बांन्या... रिहानने मला सांगितलं होतं, की जरी त्याचं आयुष्य थोडं असलं तरी तो शेवटच्या श्वासापर्यंत बांसुरी वाजवत राहील. त्याचं म्हणणं होतं की—
‘बांसुरी माझी प्राणवायू आहे, शुभ्रा... ती थांबवली तर मी आधीच मरेल.’ ”
बांन्याने एक खोल श्वास घेतला.
> बांन्या:
“असं प्रेम म्हणजे आत्मघात शुभ्रा. आयुष्यावर प्रेम करायला पाहिजे, एखाद्या बांसुरी वर नाही.”
तेवढ्यात दूरून एक ओळखीचा सूर ऐकू आला — रिहानची बांसुरी.
बांन्या आणि शुभ्रा दोघंही एकदम वळले.
दूर, जुन्या झाडाखाली, रिहान बसला होता — डोळे मिटलेले, हातात बांसुरी, आणि वारा जणू त्याच्या सुरांवर थिरकत होता.
---
दृश्य 2 — रिहानचा एकटा संवाद
रिहान बांसुरी वाजवत असताना थांबतो. त्याच्या छातीतून श्वासाचा आवाज येतो. हात थरथरतो.
त्याच्या समोर त्याच्या आईचा फोटो ठेवलेला असतो.
> रिहान (हळू आवाजात):
“आई... तू नेहमी म्हणायचीस, ‘माझा रिहान लोकांना आनंद देतो.’
पण आई, आता माझं आनंद देणं माझ्या मृत्यूचं कारण बनलंय...
तरीही मी थांबू शकत नाही. कारण ही बांसुरी माझ्या आतली शुभ्रा आहे.”
तो बांसुरी पुन्हा ओठांवर नेतो, पण काही सूर निघत नाहीत. रक्ताचा एक थेंब त्याच्या ओठांवर येतो.
तो हाताने पुसतो आणि पुन्हा बांसुरी वाजवतो.
---
दृश्य 3 — गल्लीतील गुंडांचा कट
शहराच्या दुसऱ्या टोकाला — काही गुंड एका चहाच्या टपरीवर बसलेले.
त्यांचं नेत्त्व करणारा होता मंकी, तोच जो शुभ्राला प्रपोज करून अपमानित झाला होता.
त्याच्या डोळ्यांत सूड जळत होता.
> मंकी (रागाने):
“ती बाई माझं गुलाब तोंडावर फेकून गेली रे! आज दाखवतो मी तिचं प्रेम काय असतं!”
त्याच वेळी तिथे बांन्या येतो, तो शांत आहे पण त्याच्या नजरेत काहीतरी ठरलेलं आहे.
> बांन्या (थंड आवाजात):
“मंकी, मी पण त्या मुलीला ओळखतो. शुभ्रा माझी बेस्ट फ्रेंड आहे... पण ती आता माझ्यापासून दूर गेलीये.
ती आता त्या बांसुरीवाल्यावर प्रेम करते... रिहानवर.”
> मंकी:
“मग काय करायचं?”
> बांन्या (हळू पण थरकाप आणणाऱ्या आवाजात):
“काही असं करायचं, की तिचं आणि त्याचं प्रेम कायमचं थांबावं... कायमचं.”
मंकी हसला — “समझ गया भाई।”
---
दृश्य 4 — शेवटची भेट
रात्रीचा वेळ.
शुभ्रा आणि रिहान एका जुन्या पुलावर भेटतात.
चंद्रप्रकाशात शुभ्राचं चेहरा उजळतो आणि रिहानचं शरीर मात्र थरथरतं.
> शुभ्रा:
“रिहान, तुला डॉक्टरनं सांगितलं होतं ना बांसुरी वाजवू नको? मग का नाही ऐकत?”
> रिहान (हसत):
“कसं थांबवू शुभ्रा? बांसुरी थांबली तर माझं हृदय थांबेल.
आणि जर माझं हृदयच तुझ्या नावाने धडधडतंय, तर मी त्याला थांबवू कसं?”
शुभ्राच्या डोळ्यात अश्रू येतात.
ती म्हणते—
> शुभ्रा:
“तू मरशील रिहान...”
> रिहान (हळू आवाजात):
“मी आधीच तुझ्यात जगतोय शुभ्रा... आता फक्त शरीर संपणार आहे.”
तेवढ्यात दूरून पावलं ऐकू येतात — मंकी आणि त्याचे गुंड येत असतात.
बांन्याही त्यांच्या मागे आहे.
---
> बांन्या (ओरडत):
“थांब रे रिहान!!”
रिहान वळतो, आणि अचानक त्याच्या तोंडातून रक्त पडायला लागतं.
तो गुडघ्यावर बसतो, बांसुरी हातात घट्ट धरतो.
शुभ्रा धावते आणि त्याला पकडते.
> शुभ्रा (रडत):
“रिहान!! बोल ना काहीतरी...!”
> रिहान (श्वास घेत):
“ही अंगठी... तुझ्यासाठी होती...”
तो तिच्या बोटात अंगठी घालतो आणि शेवटचा श्वास घेतो.
त्याच्या बांसुरीतून शेवटचा सूर बाहेर पडतो — दु:ख, प्रेम, आणि विरहाचं मिश्रण.
शुभ्रा कोसळते.
---
दृश्य 5 — शेवटचा वार
गुंड मागे उभे आहेत.
बांन्या पुढे जातो, त्याच्या चेहऱ्यावर आता एक विचित्र शांतता आहे.
> बांन्या (शुभ्राकडे पाहत):
“तू तर माझी बेस्ट फ्रेंड होतीस ना? तू तर म्हणाली होतीस की माझ्याशिवाय तू जगू शकत नाहीस... मग तू या बांसुरीवाल्यावर प्रेम केलंस का?”
शुभ्रा काही बोलत नाही.
बांन्या मंकीकडून बंदूक घेतो.
क्षणभर काहीही आवाज नाही — फक्त वारा आणि बांसुरीचा एक अधुरा सूर.
एक गोळी सुटते.
शुभ्रा पडते.
---
> बांन्या (हळू आवाजात):
“आता ना तू, ना तो... फक्त मी आणि ही बांसुरी.”
तो ती बांसुरी उचलतो, पण ती आता तुटलेली असते.
आणि आकाशात चंद्रही ढगांच्या आड जातो.