*इंदुकोटी तेजकिरण स्तोत्र* या संबंधीचा कथाभाग हा अत्यंत प्रासादिक, गुरुमहात्म्य व गुरुवाक्यावर दृढ निष्ठा व्यक्त करणारा असा आहे. नरहरीं नावाच्या उपासक भक्तावर त्याचे कुष्ठ निवारण व्हावे म्हणून त्याला औदुंबर वृक्षाचे एक शुष्क खोड श्रीगुरुंनी वाटसरूच्या मोळीतून काढून दिले व रोज त्याला पाणी घालण्यास सांगितले. तसे त्या नरहरी नामक अद्भुत भक्ताने निष्ठेने केले. भीमा-अमरजा संगमावर जाऊन ते शुष्क काष्ठ रोऊन रोज त्याला पाणी घालून सेवा करू लागला. श्री गुरूंनी त्याची गुरुवाक्यावरील श्रद्धा व धृढ निष्ठ
-- M