🏵️ छोले कटलेट
🏵️साहित्य
एक वाटी छोले
दोन मिरच्या
आले
जिरे
बडीशेप
कोथिंबीर
काळे व पांढरे तीळ
मीठ चवीनुसार
तिखट
हळद
कसुरी मेथी
गरम मसाला
ओरिगानो (ऐच्छिक)
🏵️कृती
रात्री छोले भिजवुन ठेवावे
सकाळी त्यात मिरची आले घालून कमी पाण्यात भरड वाटावे
🏵️या वाटलेल्या मिश्रणात जिरे ,बडीशेप ,कोथिंबीर ,तिखट
हळद ,कसुरी मेथी ,गरम मसाला ओवा ओरिगानो (ऐच्छिक) घालून एकत्र मळून घ्यावे व साच्यातून बदामी आकारात शेप द्यावा
अर्धा तास फ्रीज मध्ये सेट करावे
🏵️ अर्ध्या तासानंतर
कढईत तेल घालून कडकडीत तापवावे
नंतर गॅसची आच मंद करुन हे कटलेट खरपूस तळून घ्यावेत
🏵️सोबत
कांद्याच्या रिंग
आणि टोमॅटो सॉस