🌱ओव्याची पाने
आणि बटाटा 🥔भजी
🌱बटाटा भजी नेहेमी केली जातात
माझ्याकडे ओव्याचे झाड असल्याने ओव्याची पानांची भजी सुद्धा नेहमी होतात
हे थोडे वेगळे कॉम्बिनेशन...
🌱साहित्य
दहा बारा ओव्याची पाने
दोन मध्यम बटाटे
अर्धा चमचा तिखट
हळद.
एक चमचा बडीशेप
मीठ चवीनुसार
🌱कृती
प्रथम ओव्याची पाने बारीक तुकडे करून घेणे
बटाटे धुवून त्याच्या पण बारीक
काचऱ्या करणे
दोन्ही काप एकत्र करून
तिखट मीठ हळद व बडीशेप घालून मिक्स करणे
याचा गोळा होईल इतपत डाळीचे पीठ घालून
दोन मोठे चमचे कडक तेलाचे मोहन घालून
पीठ भिजवून दहा मिनिटे झाकून ठेवावे
दहा मिनिटांनी तेल कडकडीत तापवून आच मंद करावी
व या पिठाची भजी तळावी
थोड्या वेगळ्या चवीची खुसखुशीत चवदार भजी तयार होतात
सोबत टोमॅटो सॉस