Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

🥭आंब्याचे सांदणे

🏵️सव्वा वाटी केशरी रवा
अथवा थोडा जाडसर रवा
एक वाटीभर आंब्याचा रस थोडे केशर घालून
(केशर आपल्या आवडीनुसार वापरावे )
चवीनुसार मीठ
पांव चमचा सोडा
चार चमचे साखर
मी काळी साखर (ब्राऊन शुगर )वापरली होती

🏵️रवा कोरडाच भाजुन घ्यावा
आंब्याचा रस व रवा एकत्रित करून भिजवून घेणे
लागल्यास थोडे दूध वापरावे
दोन तासांनी पुन्हा मिश्रण थोडे घट्ट होते
परत लागेल तितके दूध घालून
सरसरित करून घेणे ..

🏵️आंब्याच्या गोडीच्या प्रमाणात साखर घालणे
गोड पदार्थात घालतो तसे थोडे चवी पुंरते मीठ घालणे
व मिश्रण पांव चमचा सोडा घालून चांगले फेटून घेणे

🏵️इडली पात्राला तुपाचा हात लावून मिश्रण वाफवून घेणे
कुकरच्या भांड्यात वाफवून याच्या वड्या पाडून सुद्धा छान होतात .
खाताना गरम सांदणे सोबत साजूक तूप घेऊन नुसतेच खाऊ शकता
अथवा दूध गूळ किंवा नारळाच्या गोड दुधासोबत याचा आस्वाद घेता येईल

🏵️सोबत मी कालच केलेल्या घरचे कैरीचे लोणच घेतले 😋

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112023899
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now