" प्रेम आहे तुझ्यावर"..म्हणालो....
.......तर म्हणतेस..".काहीतरीच.. काय..??"
आणि मान उडवतेस...
पण डोळे तर तुझे ...काही वेगळंच दाखवत असतात..!
............नाही नाही म्हणतेस मानेने..
..पण..हे तुझे...लालचुटुक ओठ तर..
.......काही वेगळेच सांगु पहातायत..!!
.................जवळ येतेस काहीतरी सांगायला..
..तर गालावरचा गुलाबी रंग ...
चहेरा खुलवत असतो.....!!!
...किती नाही....नाही..म्ह्मणलंस,,तरी..
तुला कळतय का" वेडाबाई.."
अग जेव्हा मी गुंतलो ना तुझ्यात.....
तेव्हाच तुलाही घेतलय गुंतवुन माझ्यात..!!