#बँकडायरी
असाच बँकेतील दुसरामित्र..
गौरव शर्मा.
काही दिवसा पुर्वी गौरव ने एक छान बाईक खरेदी केली
बाईक चे वेड त्याला होतेच पण त्याच्या पप्पा नी इतके दिवस मनाई केली होती
कारण गौरव खुप फास्ट बाईक मारतो हे त्यांना माहीत होते
बिहार मध्ये राहून त्यांना त्याची काळजी नको होती ..
मग गौरव ने मला मध्यस्थ घालून पपांची परवानगी मिळवली होती
त्याच्या पपा ना पण मी म्हणजे त्याची तिथली पालक वाटत होते
अधुन मधुन माझे त्यांचे गौरव च्या फोन वर बोलणे पण होत असे ..
अशा तऱ्हेने एकदा गौरव ला बाईक मिळाली ..
स्वारी अगदी खुष होती ..स्वत वर बाईक वर आणी माझ्या वर सुद्धा ..
दुसऱ्या च दिवशी शनिवार होता .ऑफिस संपल्या वर राईड ला जाणार होती स्वारी !!
दिवस पावसाळी होते त्यामुळे मी आधीच त्याला सांगितले होते जपुन जा ..
बरोबर एक मित्र होता त्याचा ..दोघे ही या गावात नवीन
त्यामुळे या भागाची रस्त्यांची पण काही खास माहिती नाही
पण मुलेच ती नव्या पिढी ची ..थोडीच ऐकणार आहेत ..
मी पण काम आटोपून घरी निघुन गेले
घरी गेल्या वर घरच्या व्यापात बँकेतला विषय बाजुला राहिला
अचानक रात्री फोन वाजु लागला ..घड्याळ पहिले रात्री चे अकरा वाजले होते
इतक्या रात्री कोण असावे ...फोन पाहिला तर गौरव चा .
म्याडम जी हम् गौरव बात कर रहे है .
अरे इतनी रात गये ..क्या बात है ?मी विचारले
म्याडम हम् फस गये है यहा ..बाईक फिसल गयी है ..
अरे लेकिन तुम लोग तो दोपर को गये थे ..अभी तक क्या कर रहे हो और हो कहा ??
माझी प्रश्न ची सरबत्ती संपत नव्हती ..
म्याडम सुनो तो वो सब बाद मे बतायेंगे फीलहाल हम् कहा है ये हमे भी नही पता
हे ऐकुन मी चकित झाले ..थोडी चौकशी केल्या वर समजले ..
दुपारी बाहेर पडलेली गौरव आणी त्याचा मित्र ही जोडी राईड च्या नादात भलती कडेच गेली होती
आणी जोरदार पावसात सापडल्याने बाईक स्लीप झाली होती
दोघांच्या मोबाईल ची केव्हाच “वाट “ लागली होती
पण नशीब म्हणजे गौरव ला माझा नंबर आठवत होता ..
जवळ असणाऱ्या एका दुकानातून त्याने हा फोन लावला होता
दुकानदार हिंदी भाषा कळणारा नव्हता त्यामुळे तो त्यांच्या शी संवाद साधु शकत नव्हता “
मग मीच फोन वर विचारल्यावर मला समजले ते दोघे सातार च्या आसपास होते
मग मी त्याला धीर दिला आणी तुमची व्यवस्था करते असे सांगितले
सुदैवाने दोघांना थोडे फार खरचटले होते ..फार लागले नव्हते ..
मग मी सातारला भावाला फोन केला तो त्या दोघांना घरी घेवून गेला .
बाईक पण किरकोळ दुरुस्ती साठी दिली .
दुसऱ्या दिवशी दुपारी गौरव आणी त्याचा मित्र सुखरूप त्याच्याच बाईक वरून कोल्हापूरला पोचले
माझ्या घरी आल्यावर गौरव म्हणाला
म्याडम आपका शुक्रिया कैसे अदा करे समझ नही आता
इतनी रातको हमे वहा कौन मदद करता .?
आपने तो जैसे देवी मा के माफिक हमे मदद पाहुचायी
मी फक्त हसले ..गौरव ऐसा कुछ नही है .,.
अपने रिश्ते ही ऐसे ही है ना
मात्र त्याने माझ्या कडून त्या वेळेस प्रॉमिस घेतले की झाली गोष्ट मी पपा ना सांगणार नाही
मी पण कबुली दिली
कारण मी पण आईच होते ना एका मुलाची !😊😊