या क्षणी.....!!
.........................................................
"या क्षणी.."
तुझे हात माझ्या हातात गुंफलेत..
तुझ्या उबदार हातांचा..स्पर्श..खुप आल्हाददायक..वाटतोय.
माझे डोळे तुझ्या डोळ्यात ..गुंतलेयत..
तुझ्या हातांचा..गुलाबी रंग..तुझ्या गालावर पण चढलाय..!!!!
.....................समाजाचे नीती नियम..
.....................जगाचे रीत रिवाज...
.......................आप्तेष्टांचा,,विरोध...
..या सर्व.."फालतु" गोष्टि..मनात ठेवुन ..
तु मात्र..चिंतीत आहेस...!!
पण "राणी"..नको ग काळजी करुस..
आपल्या प्रितीची ही वाट......
तुला अंतीम सुखाकडेच घेवुन जाईल..
याची खात्री बाळग....नव्हे....!
तसे वचनच..तुला देतोय...मी..
हातात हात गुंफुन...
.........................."या क्षणी"