समजदार व्यक्ती ची व्याख्या प्रत्येक समजदारा गणिक वेगवेगळी असते.
पण माझ्या मते प्रत्येक कुटुंब, परिवारातिल ,
जो सदस्य लहान, मोठा,समव्यस्क, वयस्क, म्हातारे.
अश्या प्रत्येक सदस्या चा चांगला वाईट स्वभाव, भाव, भावना, ह्या जाणीवपूर्वक समजून घेतो
व स्वतःचा अह्म् भाव बाजूला सारून परिवारातील प्रत्येक सदस्याला जसा आहे तसा त्याच्या स्वभाव सकट स्वीकारतो , जो कुटुंंबात सर्वांप्रती स्वीकार भाव ठेउन् जागरूक वागतो तो व्यक्ती खरा समजदार झाला,
असे समजण्यास काहीच हरकत नाही.
यात त्याचे वय, लहान वा मोठा असा फरक रहात नाही.
तात्पुरती आणी कायमची समजदारी यात हा फरक असावा...!
यावर तुमचे मत काय ??
-योगेश जोजारे