प्रेम म्हणजे काय असते
प्रेमाला तरी कळते का
नजरेआड होता ती
मनाला तिला बघण्याची ओढ लागते का
अचानक समोर येता ती
मनाची धडधड वाढते का
कितीही तिच्याशी बोलले
तरी मन कधी भरते का
ती नसताना आजुबाजुला
रात्री तिची आठवण येते का
प्रेम म्हणजे काय असते
प्रेमाला तरी कळते का