आम्ही चौघी !!!
बोलता बोलता *पंधरा* वर्ष झाले ...
आमच्या या नाटकी मैत्रीला !!!
हा ! नाटकी या साठी 😅
कारण यामध्ये फक्त प्रेम ,
आपुलकी , जिव्हाळा नाही तर
यामध्ये राग , रुसवे , फुगवे ,
मत्सर, हेवा , तिरस्कार सुद्धा येऊन गेला !
जेव्हा भेटलो तेव्हा प्रेम , जिव्हाळा कमी तर
अभ्यासामध्ये स्पर्धा दिसली ...
पण या स्पर्धमध्ये स्पर्धक म्हणून
नाही तर सोबती म्हणून यशस्वी ठरलो !
प्रेम, काळजी तर वाढत चालली होती ...
पण कुठे तरी दुरावा ही आमची
मैत्री अनुभवू पाहत होता !
सुरुवात तर त्याने दोघी दोघींना
वेगळं करून केली !
पण त्या दुराव्यात नवीन
भविष्याची धडपड दाखवून दिली !
या धडपडी मध्ये शेवटी
दोन चे चार वेगळे रस्ते झाले ..
प्रत्येक रस्त्यावर चौघी एकट्या नव्हतो तर प्रत्येकीची जिद्द सोबत होती !
कधी कोणाला भरकटू दिलं नाही
या मैत्रीने !
जिथे चुकी दिसली तिथे
कान पकडून रस्ता दाखवला !
जिथे संकट दिसल तिथे
आत्मविश्वास बनून शेवट केला !
एखाद्या जोडप्या सारखं मत्सर होता आमच्यामध्ये !
चौघी पेक्षा एक नवीन म्हणजे
'कबाब मे हड्डी ' आमच्यामध्ये !!!
नेहमीच हसत , खेळत राहिलो अस नाही तर कधी रागात ,
भांडणं करून अगदी व्हॉट्स ग्रुप
लेफ्ट करून मैत्रीचा शेवट ही केला !
पण जेव्हा कधी एकट वाटल तेव्हा अश्रू पुसणारी हक्काची
मैत्रीचं पुन्हा पुढे दिसली !!!
हा ! ती इतकी स्वच्छ , निखळ
आहे की तिने कधी वाईट नाही
तर नेहमी चांगल च दाखवलं !
अगदी आयुष्याचे सगळ्यात
महत्वाचे निर्णय सुद्धा या
मैत्री ने एकमेकींना समजावत घेतले !
हा ! बऱ्याचदा दूर गेलो आम्ही
अगदी सगळ संपलं इतक्या दूर ...
पण नव्याने जवळ आलो नेहमी !
जेव्हा कोणी आमच्यासाठी नसत तेव्हा फक्त
हा एक च मैत्रीचा खजिना
आमच्या पुढे दिसतो !!!
इच्छा तर आहे ,
पण जिद्द पण आहे
शेवट पर्यंत अशीच सोबत राहूदे
ही नाटकी मैत्री !!!!