. आजचा विषय एक स्व रचित रूपक कथेवरून सोपा करून सांगता येईल .एक राजा दोन जुळ्या मुलांपैकी एकाला सर्व कला आणि विद्या यांचे प्रशिक्षण देतो. दुसऱ्याला व्यापार आणि व्यवसाय प्रशिक्षण देतो .नंतर राज्य कारभार एकत्र मिळून संभाळण्यास सांगून वनात निघून जातो. पण राजा निघून गेल्यावर दोघे भाऊ राज्य अर्धे वाटून घेतात. कालांतराने एकाच्या राज्यात सुख ,समृद्धी आणि त्यांच्या पुर्ततेची साधने विपुल प्रमाणात येतात .राजा आंनदी होतो पण त्याचवेळी गुप्तचर बातमी आणतात ,की राज्यातले नागरिक नगर सोडून बाजूला भावाच्या राज्यात जात आहेत. संपत्ति, सुख साधने उपलब्ध असूनही लोक नगर का सोडत आहेत? असे काय असेल आपल्या भावाच्या राज्यात? हे जाणून घेण्यासाठी राजा वेष बदलून भावाच्या नगरीत जाण्यास निघतो .अर्ध्या वाटेत आपल्या नगरीत वेष बदलून येत असलेला त्याचा भाऊ त्याला दिसतो. त्यालाही समान प्रश्न पडला आहे आणि तोही उत्तर शोधण्यासाठी आपल्या नगरीत येतो आहे ,असे त्याला समजते आणि तो आश्चर्य चकित होतो.
या बोध कथेवरून मानवी मनाचे बरेच पैलु स्पष्ट होतात .आपल्याजवळ जे आहे त्यात संतोष न मानता दुसऱ्या कडील संचिता कडे मन धाव घेते. मानवी मनाची तुप्ती ही अज्ञाताकडे ,आप्राप्त ध्येयाकडे जाण्याची असते. ही अस्वस्थता योग्य मार्गाने वळविल्यास ;नवं निर्मिती कडे किंवा शोधन discovery घडवून आणते ,साक्षात्कार घडविते .यासाठी गरजेचे आहे की ध्येय प्राप्तीच्या आपल्या ईच्छा , अपेक्षाना योग्य वळण लावावे.
दुसरा पैलु असा की , धन आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी मानवी जीवनाच्या संतुष्टीसाठी आवश्यक आहेत . त्या योग्य रित्याही प्राप्त होऊ शकतात .त्यांपासून पलायन म्हणजे असंतृप्तता होऊ शकते. शिवाय दोन्ही भाऊ एकमेकांच्या सहकार्याने याची पूर्तता करू शकत होते .म्हणून सहकार्यात्मक वृत्तीला ध्येयप्राप्ती साठी महत्त्वाचे मानावे .
धन मिळविल्याने भौतिक गरजा पूर्ण होतात (अन्न वस्त्र निवारा आदी ) .सुखसोई ची पूर्तता झाल्याने दिव्य ज्ञानाच्या दृष्टीने मनुष्याची वाटचाल होऊ शकते.
शेवटी महत्त्वाचा बोध म्हणजे असूया , स्पर्धा , आणि इच्छे पासून मुक्त मन हाच खरा सुखाचा मौल्यवान खजिना होय .
◆ पूर्णा गंधर्व