#KAVYOTSOV -2
*भरल्या अभाळापूर्वी*
उद्या पाऊस पडणार आहे
मला माहित नाही पण
मी डोळे झाकून विश्वास ठेवलाय सारखे मुखवटे बदलणाऱ्या ढगांवर
गच्चीवरून दिसणारा गुलमोहोर आता थोडा रंग बदलणार आहे
त्याला माहितीये आता आभाळ भरणार आहे
कुठे बहर कुठे पानगळ तर कुठे दिशाहीन पालापाचोळा
सगळ्यांना माहीत आहे
आपल्यातली ओल ओसरणार आहे
इथे पुन्हा नव्या तनूचच राज्य येणार आहे,
मावळतीला चाललेला आजचा सूर्य तो पुन्हा
नव्याने दिसणार आहे
पुन्हा खिडकीत वेल येणार आहे,
तिची-तिची तीच काचेवर पडदा करणार आहे
गेटसमोर डोह साचणार आहे
त्याच पाण्यात लहानपणीच्या होड्या वाहणार आहे
पुन्हा कोडी पडणार आहेत,
अंधारातल्या पावसाची गोडी नशेसरखी वाढणार आहे
परत जुना पाऊस कोरा होऊन पडणार आहे
नव्या थेंबाचे शहारे नवे असणार आहे
जुनी पानगळ मातीत साठणार आहे
diary पुन्हा उघडली जाणार आहे
त्यातळी ओल नितळ-उथळ होणार आहे
लाटेसारखी उसळून थोडी पांढरीशुभ्र आभाळ दाखवणार आहे
थोडी कोरी-थोडी ओली पण पुन्हा नव्याने भरणार आहे
उद्या पाऊस पडणार आहे
मला माहित नाही पण
मी डोळे झाकून विश्वास ठेवलाय सारखे मुखवटे बदलणाऱ्या ढगांवर
-shubham davange
#sd
#languageofmind .blogspot.com
#introvert_rain
#unspoken_drops