वाट पाहत आहेत छापिल पुस्तकं
सुंदरशा पुठ्ठ्यात बांधलेली
शोधत आहेत वृत्तपत्र आपल्याला
विविध लेखांनी नटलेली
आता हे सगळं मागे पडतं आहे
भ्रमणभाषाचं यंत्र सतत हातात बसतं आहे...
बोटं आपली लिहिण्याचं विसरलंच आहेत
अंगठा मात्र एकटा सतत टकटकत आहे...
जाऊया नं परत भूतकाळात???
आणि भेटूया या मित्रांना
काळाच्या गर्तेत विसर पडलेल्या
लोभत्रवाण्या आप्तांना