Good Quotes in Hindi, Gujarati, Marathi and English | Matrubharti

Good Quotes, often spoken by influential individuals or derived from literature, can spark motivation and encourage people to take action. Whether it's facing challenges or overcoming obstacles, reading or hearing a powerful Good quote can lift spirits and rekindle determination. Good Quotes distill complex ideas or experiences into short, memorable phrases. They carry timeless wisdom that often helps people navigate life situations, offering clarity and insight in just a few words.

Good bites

####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

####Good night !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
" संत तुकाराम "
----------------------
गोणी उसवोनिया हाती ।
दुकान मांडीले तये क्षिती |
चित्ती ‌बैसली पांडुरंगमुर्ती |
देहा कृती नाठवे||

नरनारी येऊनि जाण |
तुकया प्रति बोलती वचन |
विकायावयासी आणिले केण |
याची धारणा सांगावी ||

ऐकोनि म्हणे वैष्णव भक्त |
तुम्हासी नाही काय विदित |
लागेल ते न्यावे त्वरीत |
संकोच चित्ती न व्हावे ||

####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

####Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
|| जय जय ज्ञानेश्वर माऊली ||




?


# * नामाचा नंदादीप *
------------------------------

तळमळीचे तेल असल्याशिवाय नामाचा नंदादीप अंतःकरणात उजळत नाही . प्रयत्न व प्रार्थना हेच या तळमळीचे व्यक्त रुप होय .

नामस्मरणाचा सातत्याने अभ्यास करावयाचा व या प्रयत्नांना यश देण्यासाठी भगवंताची नित्य प्रार्थना करावयाची .

प्रयत्न व प्रार्थनापूर्वक नामस्मरण करता करता भगवंताची कृपादृष्टी वळते व साधकाच्या अंतःकरणात नामाचा नंदादीप प्रज्वलित होतो .

१) *सोनियाचा दिवस आजि अमृते पाहीला नाम आठवितां रुपीं प्रकट पै झाला ।।*

२) *जो जो उच्चारी नाम । तो तो प्रगटे मेघःशाम ।।*

नामाचे वैशिष्ट्य असे की , एकदा का नामाचा नंदादीप अंतःकरणात लागला की तो आपोआप तेवत राहतो व नामधारकाचे जीवन आनंदाच्या प्रकाशाने उजळवितो .

अशा या दिव्य नामाचा नंदादीप अंतःकरणात प्रज्वलित होवो हीच भगवच्चरणी प्रार्थना .

*!! रामकृष्ण हरी !!*

?

*...... सुप्रभात ......*

?

###Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

!!चमत्कारी घागर !!
------------------------------

श्री समर्थ रामदास स्वामी ह्यांच्या श्री क्षेत्र जांबसमर्थ येथील घागरीची चमत्कारिक व विशेष माहिती.
????????

समर्थ रामदास स्वामी चरित्रात उल्लेख असलेली हीच ती तुपाची घागर जिच्यातून आजही तूप निघते आहे. परंतु घागर रिकामी होत नाही , सध्या ही घागर श्री समर्थऱामदासस्वामी यांच्या जन्मस्थानी श्री क्षेत्र जांबसमर्थ; ता. घणसवंगी; जि. जालना येथील श्रीराम मंदिरात ठेवण्यात आली आहे तिथे ह्या समर्थांनी पावन केलेल्या घागरीचे दर्शन आपणास होईल... जांबेच्या निवासासाठी मोफत भक्तनिवास व मोफत प्रसादाची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच समर्थांच्या घराण्यातील रामपंचायतन व ज्या मारोती मंदिरात समर्थांना अनुग्रह झाला ते मारोती मंदिर उपलब्ध आहे. ५ किलोमीटर वर ज्या लग्नबोहल्यावरून श्री समर्थांनी पलायन केले तो बोहला आसनगाव येथे उपलब्ध आहे...

समर्थांच्या ह्या घागरी बद्दल मिळालेली विशेष माहिती अशी आहे की. ...

श्रीराम नवमीच्या आदल्या दिवशी म्हणजे अष्टमीला श्री क्षेत्र जांबसमर्थ इथ श्रीरामांचा भंडारा असतो, त्यावेळी गावात पाच सहा लाख लोक जमतात, भगवान श्रीराम व श्री समर्थांचे मुर्तीरुप दर्शन घेऊन भक्त पावन होतात. गावकरी पण पाच सहा लाख लोकांच्या सेवेत तत्पर असतात, तिर्थयात्रींची राहण्याची भोजनाची स्नानाची व्यवस्था अतिशय उत्तमपणे व विनामूल्य गावकरी लोक करीत असतात. व कुठेही काहीच कमतरता दिसत नाही, हा समर्थांचा चमत्कारच नाही का?

ह्या घागरीबद्दल अशी एक परंतु सत्य कथा ऐकायला मिळाली ती अशी. श्री रामदास स्वामींनी श्रीराम नवमी निमित्ताने भंडाऱ्याचे आयोजन त्याकाळी नुकतेच सुरु केले होते, श्री समर्थांच्या क्रुपेने कुठेच काही कमी पडत नव्हते, पण अचानक वरणभाता वर वाढण्यासाठीचे साजुक लोणकढी तुप संपले, श्री समर्थ रामदास स्वामी महान योगी तपस्वी व आपल्या योगसाधनेने काहीपण साध्य करणारे, त्यांनी तुप कमी पडल्याने ह्या वरील घागरीस दोर बांधुन बाजुच्या विहीरीत सोडले व घागरभर पाणी वर ओढले, व सेवेकऱ्यांना सांगितले ह्यातुन पंगतीला तुप वाढायला सुरूवात करा, सेवेकऱ्यांना पाणी तुप म्हणुन कसे वाढायचे हे कोडे पडले, समर्थांनी सेवेकऱ्यांना सांगितले माझा श्रीराम बघुन घेईल पुढे काय करायचे ते तुम्ही तुप वाढायला सुरुवात करा, सेवेकऱ्यांनी पंगतीला पाणी अर्थातच तुप वाढायला सुरुवात केली, त्या घागरीतील पाणी तुपात परिवर्तीत झाले व सगळ्या तीर्थयात्रींचे भोजन होईस्तोवर त्या घागरीतले तुप शेवटपर्यंत संपलेच नाही. शेवटी सर्व पंक्ती उठल्यावर समर्थांनी ती घागर घेतली व परत पाणी आणलेल्या विहीरीत रिकामी केली म्हणजे विहीरीचे पाणी देखील समर्थांनी विहीरीला परत केले.

आज सुद्धा रामनवमीच्या आदल्या दिवशी अष्टमीला जेव्हा भंडारा असतो तो घेतल्यानंतर प्रत्येक तिर्थयात्रींला तिथे संस्थान तर्फे ह्याच घागरीतुन साधारणतः 100 ग्रँम तुप मोफत वाटप केले जाते व आश्चर्य म्हणजे घागरीतले तुप संपतच नाही हा चमत्कार आपण स्वतः अष्टमीच्या दिवशी तिथे उभे उपस्थित राहुन बघु शकतात, अवर्णनीय व नेत्रदीपक असा हा सोहळा चमत्कारिक सोहळा असतो, प्रत्येकाने ह्या सोहोळ्याचा लाभ घ्यावा अशी मी आग्रहपुर्वक विनंती करीत आहे.

श्री समर्थांच्या ह्या चमत्कारिक घागरीची माहिती, श्री क्षेत्र जांबसमर्थ इथल्या समर्थ रामदास स्वामींच्या मठातील ट्रस्टचे २४ तास सेवेकरी असणारे श्री स्वप्नील रामदासी ह्यांच्याशी फोनवर चर्चा करत असताना मला त्यांच्याकडून मिळाली,त्याबद्दल श्री स्वप्नील रामदासींचे आम्ही आभारी आहोत.

श्री स्वप्नील रामदासींचा भ्रमणध्वनी क्रमांकः-9146519609 असा आहे. आपण त्यांना केव्हाही फोन करुन तिथली माहिती घेऊ शकतात, तसेच तिथ निवासाची व भोजनाची देखील विनामुल्य पण उत्कृष्ट सेवा आपणास श्री स्वप्नील रामदासी ह्यांना फोन करुन आपण मिळवु शकतात.

***** ***** *****


*??‼जय जय रघुवीर समर्थ‼?*

###Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
जय हरि विठ्ठल !