####Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
|| जय जय ज्ञानेश्वर माऊली ||
?
# * नामाचा नंदादीप *
------------------------------
तळमळीचे तेल असल्याशिवाय नामाचा नंदादीप अंतःकरणात उजळत नाही . प्रयत्न व प्रार्थना हेच या तळमळीचे व्यक्त रुप होय .
नामस्मरणाचा सातत्याने अभ्यास करावयाचा व या प्रयत्नांना यश देण्यासाठी भगवंताची नित्य प्रार्थना करावयाची .
प्रयत्न व प्रार्थनापूर्वक नामस्मरण करता करता भगवंताची कृपादृष्टी वळते व साधकाच्या अंतःकरणात नामाचा नंदादीप प्रज्वलित होतो .
१) *सोनियाचा दिवस आजि अमृते पाहीला नाम आठवितां रुपीं प्रकट पै झाला ।।*
२) *जो जो उच्चारी नाम । तो तो प्रगटे मेघःशाम ।।*
नामाचे वैशिष्ट्य असे की , एकदा का नामाचा नंदादीप अंतःकरणात लागला की तो आपोआप तेवत राहतो व नामधारकाचे जीवन आनंदाच्या प्रकाशाने उजळवितो .
अशा या दिव्य नामाचा नंदादीप अंतःकरणात प्रज्वलित होवो हीच भगवच्चरणी प्रार्थना .
*!! रामकृष्ण हरी !!*
?
*...... सुप्रभात ......*
?